Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! विषारी दारूने १० जणांचा मृत्यू

धक्कादायक! विषारी दारूने १० जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

देश करोनाचा संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. विषारी दारू प्यायल्याने १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

- Advertisement -

मोरेना जिल्ह्यातील दोन गावांमध्ये या घटना घडल्या आहेत. पहावली आणि मनिपूर अशी या गावांची नाव असून, पहावलीतील तीन, तर मनिपूरमध्ये सात लोक मरण पावले आहेत. सात जण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने तिला ग्वालियरला हलवण्यात आलं आहे. विषबाधा झालेली दारू देशी बनावटीची असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दारू प्राशन केलेल्या लोकांना मध्यरात्री उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. यातील दहा जणांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचं रुग्णालयात दाखल करताना समोर आलं. तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोरेना जिल्हा रुग्णालयात मयताच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी मयताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गोंधळ घातला. रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन जाण्याचा आग्रह रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाईकांना करण्यात आला. मात्र, ट्रॅक्टरमधूनच मृतदेह घेऊन जाऊ, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यावरून गोंधळ झाला.

दरम्यान, ८ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद पोलिस स्टेशन परिसरातील जीतगढ़ी गावात विषारी दारूचे सेवन केल्यामुळे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर १६ जण आजारी पडले होते. या प्रकरणात स्टेशन प्रभारीसह चार पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. याशिवाय उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व तीन शिपायांना निलंबित करून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या