Sunday, April 28, 2024
Homeनगरमढी मंदिरातून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

मढी मंदिरातून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या दर्शनासाठी अमावस्येनिमित्त आलेल्या पुणे जिल्ह्यातील महिला भाविकाच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने मंदिर आवारातून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि .19) सकाळी घडली.

- Advertisement -

या प्रकरणी इंद्रायणी मल्हारराव नाईकवाडी (रा. कुमशेत, ता.जुन्नर, जि. पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. यावरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी नाईकवाडी कुटुंब मढी येथे कानिफनाथांच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी 10 वा आरती झाल्यानंतर इंद्रायणी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन पदरी माळ गळ्यातून हात चलाखी करून अज्ञात चोरट्याने चोरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी मढी देवस्थानाच्या व्यवस्थापक व स्वयंसेवक यांना चोरीची घटना सांगितली .तेथील सि.सि.टि.व्ही कॅमेरे तपासून घेतले व त्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. साठ हजार किमतीचे एक सोन्याचे 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र त्यात एक पेंडल व साखळी, एक लाख रुपयांची सोन्याची दोन पदरी 25 ग्रॅम सोन्याची माळ असा एकूण 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज होता. अधिक तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या