Friday, April 26, 2024
Homeनगरमढी खुर्द परिसरात बिबट्याची दहशत

मढी खुर्द परिसरात बिबट्याची दहशत

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द परिसरातील नाशिक रस्ता भागात गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याचे अनेकांना दर्शन झाले आहे. शेतात राहणारे शेतकरी दहशतीत असून दररोज सायंकाळी फटाके वाजवून ते आपले स्वतःचे रक्षण करीत आहेत.

- Advertisement -

बाबुराव म्हसू आभाळे यांच्या घरासमोर ओट्यावर चार दिवसांपूर्वी साडेनऊ वाजता बिबट्या दिसला. पावसामुळे कोरड्या जागेच्या शोधात तो आला असावा. तर दुसर्‍याच दिवशी दीपक आभाळे यांनी रात्री तीन वाजता तो त्याच घरी शेळ्यांच्या गोठ्या शेजारी फिरताना पाहिला आहे. रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांनीही अनेक वेळा तो पहिल्याचे सांगितले आहे. तर काहींनी ती मादी असून तिच्यासोबत बछडे असल्याचेही सांगितले आहे.

आजूबाजूच्या सर्व परिसरात पावसामुळे त्याचे पायाचे ठसे स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे शेतकरी दिवसाही शेतात जाण्यास घाबरत आहेत. सदर परिसराच्या जवळच रानडुकरांचाही त्याने फडशा पाडल्याचे अवशेष दिसत आहेत. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी दूध-दुभती जनावरे असूनही लोक सायंकाळी सहा वाजता त्याच्या दहशतीने घराच्या बाहेर पडत नाहीत. वनविभागाने त्वरित लक्ष घालून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या