Friday, April 26, 2024
Homeनगरमढी बुद्रुक येथे 2 लाखांच्या सोन्याच्या ऐवजाची चोरी

मढी बुद्रुक येथे 2 लाखांच्या सोन्याच्या ऐवजाची चोरी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

मामांचे ऑपरेशन झाले म्हणून त्यांना भेटायला गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची घटना तालुक्यातील मढी बुद्रुक येथे घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

फिर्यादी बापू एकनाथ गवळी (वय 43) हे शेतकरी त्याची पत्नी मनीषा व मुलगा सार्थक असे तिघे जण राहत असलेल्या घराला बाहेरून कुलूप लावून सडे, ता. कोपरगाव येथे त्यांचे मामा अशोक बारहाते यांना भेटण्यासाठी गेले होते.

अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील सामानाची तसेच कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सामानाची उचकापाचक करत 40 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र, 50 हजार रुपये किमतीचे तीन तोळे वाजनाचा एक राणीहार, 80 हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे एक सोन्याचे पॅन्डलसह गंठण, 6 हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स तर 10 हजार रुपये किमतीच्या एक पाच ग्रॅम वजनाचे कानातील रिंग असा एकूण 1 लाख 86 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

याबाबत बापू एकनाथ गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं 364/2023 भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुरेश आव्हाड करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या