जिल्हा बँक : संगमनेरमधून कानवडे व सांगळे बिनविरोध

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर | Ahmedagar

संगमनेर तालुक्यातून माधवराव कानवडे व गणपतराव सांगळे जिल्हा बँकेत पोहचले आहेत.

संगमनेर सेवा सोसायटी मतदारसंघातुन माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली.

त्यांच्या विरोधात असलेल्या चौघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कानवडे यांची बिनविरोध निवड झाली.

तर भटक्या विक्त मतदार संघातून गणपतराव सांगळे बिनविरोध झाले.

माधवराव सावळेराम कानवडे सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे गेली पंधरा वर्षे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. तर 25 वर्षे संचालक होते.

संगमनेर तालुक्यातील गावोगावी पाण्याच्या पाईपलाईन करण्यासाठी त्यांनी आंदोलन केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या समवेत त्यांनी विविध आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

साखर कारखानदारी मधील एक अभ्यासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

त्याच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात थोरात सहकारी साखर कारखान्याने 5500 मेट्रिक टन क्षमतेचा नवीन कारखाना व 30 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प उभा राहिला.

ऊस तोड कामगार ते कारखाना साखर कारखान्याचे चेअरमन असा माधवराव कानवडे यांचा प्रवास राहिला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट सहकार कार्यकर्ता म्हणून माधवराव कानवडे यांंना सन्मानित करण्यात आले.

गणपतराव पुंजाजी सांगळे हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची गेली 10 वर्ष संचालक तर संगमनेर तालुका दुध संघाचे पाच वर्षे उपाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती आहेत.

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे गेली 35 वर्षापासून विश्वासू कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत असून ओबीसींचे तालुक्यातील प्रमुख नेते आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *