Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनव्या धोरणांमुळे 'मेड इन इंडिया'ची विश्वसनीयता वाढली!

नव्या धोरणांमुळे ‘मेड इन इंडिया’ची विश्वसनीयता वाढली!

औरंगाबाद – aurangabad

गेल्या काही वर्षांत (Central Government) केंद्र सरकारच्या वतीने नवनवीन धोरणांच्या माध्यमातून भारतीय उत्पादनांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तम असे प्रयत्न केला जात आहे. त्याला आपल्याकडील कंपन्या (Companies) देखील साद देत आहेत. त्यामुळे ‘मेड इन इंडिया’ (Made in India) उत्पादनांची विश्वसनीयता वाढत चालली आहे. मुळातच आपल्या भारत देशाकडे जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा फार आधीपासून सकारात्मक आणि चारित्र्यवान म्हणून राहिला आहे. त्यात दर्जेदार, टिकाऊ, ग्राहकांचे हित जोपासणारी उत्पादने देशाची मान उंचावण्यासाठी पूरक ठरत आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी विष्णूपादानंद महाराज (Swami Vishnupadananda Maharaj) यांनी केले. औरंगाबादच्या सोलर वॉटर हिटरला (Solar water heater) भारत सरकारच्या वतीने थ्री स्टार मानांकन मिळाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विष्णूपादानंद महाराज बोलत होते.

- Advertisement -

यावेळी आरटीसीच्या (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) समन्वयक डॉ. अनघा पाठक, महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक विजय काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी विष्णूपादानंद महाराज यांच्या हस्ते मानांकन मिळालेल्या सोलर वॉटर हिटरचे लोकार्पण करण्यात आले.

रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी विष्णूपादानंद महाराज म्हणाले की, प्राचीन काळापासून परदेशी प्रवासी जेव्हा भारतात येत तेव्हा भारतीयांना ते अतिशय प्रामाणिक लोक म्हणून संबोधत असत. कारण आपल्या देशाचे चारित्र्य उच्च दर्जाचे होते. कालांतराने त्याचे पतन होत गेले खरे पण मध्यंतरीच्या काळात ही घसरण थोपवण्यात यश आले. आज ‘मेक इन इंडिया’च्या उत्पादनांना देश-विदेशातून मागणी आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार उत्पादने तयार करणे प्रत्येक कंपनीची जबाबदारी आहे. आताचे युग हे मानांकनाचे युग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे उत्पादनाची पत उंचावणे, उच्च दर्जाची सामग्री वापरणे, आंतरिक व्यवस्थापन प्रामाणिक असणे आणि ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने देणे ही एकप्रकारे राष्ट्रसेवाच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या