Thursday, April 25, 2024
Homeनगरघर देता का घर?; मदारी समाजाचे आंदोलन

घर देता का घर?; मदारी समाजाचे आंदोलन

जामखेड | तालुका प्रतिनिधी | Jamkhed

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर व आमदार रोहित पवार यांच्या कार्यालय समोर पालठोको आंदोलन व गारुड्याचा खेळ करून आंदोलन केले. मदारी समाजाने तहसील कार्यालयासमोरच चुल पेठवुन चहा भात करून जेवन करण्यात आले.

- Advertisement -

खर्डाचा मदारी समाज महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सबंधित सर्व यंत्रणांनांशी चर्चा करण्यात येऊन २ महिन्याच्या आत बैठक घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे व गट विकास अधिकारी परसराम कोकणे यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेले तहसिल कार्यालयासमोरील पाल ठोको आंदोलन व आमदार रोहित पवार यांच्या कार्यालय समोरचे आंदोलन मागे घेण्यात आले.

अती उच्च दाबाच्या वीज वाहक तारांच्या अडथळ्यामुळे खर्डा येथील मदारी वसाहतीसाठी यापूर्वी निवडण्यात आलेली गट नंबर ११८६/२ मधील एक हेक्टर जागा बदलून खर्डा ग्रामपंचायतीने गटनंबर ११४१ मधील १ हेक्टर जागा प्रस्तावित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली असून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केलेला आहे. सदर जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळताच सुधारित अंदाज पत्रक तयार करून अतिरिक्त निधीबाबत चा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल असे या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या