Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

संगमनेर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय महिलेवर एका जणाने पाच वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. सदर महिला नऊ महिन्यांची गर्भवती असताना लग्न न करताच या इसमाने पलायन केल्याने सदर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून अत्याचार करणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील राजापूर परिसरातील महिला व खेड तालुक्यातील नागेश गुलाब कराळे यांची ओळख झाली. नंतर दोघांचे प्रेमसबंध जुळल्याने त्याने लग्नाचे आमिष दाखवून या महिलेवर राजापूर येथे पाच वर्षे शरीर संबंध ठेवले. सदर महिला गरोदर असल्याचे समजल्यानंतर कराळे याने पलायन केले. महिला व तिच्या आईने लोकांकडून घेऊन दिलेले पैसे त्याने परत दिले नाही. या महिलेची जुपिटर गाडी व दोन वर्षांपूर्वी राजापूर गावात खरेदी केलेल्या मालमत्ताचे खरेदीखत व आधारकार्ड, पॅनकार्ड घेऊन तो पळून गेला.

याबाबत अत्याचारित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं.वि .कलम 376,504,506 प्रमाणे नागेश गुलाब कराळे, राहणार चांडोली फाटा, तालुका खेड, जिल्हा पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या