श्रीरामपूर भाजपा संचालन समितीला तालुक्यात 47 उमेदवार विजयी तर 2 ग्रामपंचायतीत बहुमत-लुणिया

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्रीरामपूर भाजपा संचालन समितीला घवघवीत यश मिळाले आहे.

तालुक्यातील 27 पैकी दोन ग्रामपंचायतीत पूर्ण बहुमत मिळवतांनाच संचालन समितीने उभ्या केलेल्या 47 उमेदवारांपैकी 40 जण मताधिक्याने विजयी झाले आहेत, अशी माहीती भाजपाचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक किरण लुणिया यांनी दिली आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर युती करण्याचे व निवडणुका लढविण्याचे स्वातंत्र्य भाजपा संचालन समितीने दिले होते. एकूण 27 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायतीतील 47 जागांवर भाजपा संचालन समितीचे कार्यकर्ते उभे राहिले होते.

मातुलठाण, गोंडेगाव, ब्राह्मणगाव वेताळ, महांकाळवाडगाव, निपाणीवडगाव, कारेगाव, लाडगाव, बेलापूर बु, बेलापूर खुर्द, टाकळीभान, भोकर, उंबरगाव, मांडवे व पडेगाव या ग्रामपंचायतीमध्ये 40 जागांवर समितीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपा संचालन समितीचे कार्यकर्ते गेल्या वीस वर्षापासून भाजपामध्ये सक्रिय आहेत वीस वर्षाच्या संघर्षानंतर तालुक्यातील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपाच्या वाटचालीमध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्व महत्वपूर्ण आनंदाचा असल्याचे किरण लुणिया यांनी म्हटले आहे.

भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी अथक परिश्रमातून व चिकाटीने ही संघटना बांधली जोपासली व वाढवली या संघटनेला जनतेची स्वीकृती मिळणे म्हणजेच श्रीरामपूर तालुक्यात भाजपाच्या ताकतीवर जनतेने दाखविलेला विश्वास आहे भाजपा संचालन समितीच्या विजयी उमेदवारांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *