Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedग्रहणातच होणार चंद्रोदय!

ग्रहणातच होणार चंद्रोदय!

औरंगाबाद – aurangabad

२०२२ या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या कार्तिक पौर्णिमेस (Kartik Purnima) म्हणजेच मंगळवारी (८ नोव्हेंबर) खंडग्रास स्थितीत होणार आहे. १५ दिवसांत होणारे हे दुसरे ग्रहण असेल. हे भारतातही दिसणार असून उत्तर आणि दक्षिण अमेरिका (North and South America), ऑस्ट्रेलिया, आशिया (Australia Asia), उत्तर पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागरात देखील दृश्यमान होणार आहे. यावेळेस चंद्रग्रहण सुरू असतानाच पूर्व क्षितिजावर चंद्र उगवणार असल्याने या ग्रहाला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असेही म्हटले जाते. 

- Advertisement -

Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता…

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते.

यंदाचे चंद्रग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्‍य असल्याने व पूर्व आकाशात उगवताना दिसणार असल्याने रक्तवर्णी चंद्र पाहण्याची मजा काही औरच असणार आहे अशी माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. मराठवाड्यात सर्वप्रथम नांदेड व हिंगोली येथे सायंकाळी ५:४२ वाजता तर सर्वात शेवटी औरंगाबाद येथे सायंकाळी ५:५० वाजता चंद्रोदय ग्रहण स्थितीतच होईल. आपल्याकडे ग्रहण कमाल ग्रासण्याची वेळ ही ५:५७ वाजता असणार असून यावेळेस पृथ्वीच्या दाट छायेत चंद्र साधारणत: नांदेड व हिंगोली येथे सर्वात जास्त ५२ टक्के तर औरंगाबाद येथे सर्वात कमी ३३ टक्क्याने असेल. 

ग्रस्तोदित चंद्रग्रहण दर्शन या खगोलीय उपक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेदरम्यान या ग्रहणाचे छायाचित्रण व अभ्यास गोगाबाबा टेकडीवरून केला जाणार आहे सोबतच यावेळेस दुर्बिणीतून या ग्रहणाचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. ग्रहणातच चंद्रोदय होताना दिसणार असल्याने हौशी छायाचित्रकारांना या ग्रहणाचे फोटो काढण्याची ही एक पर्वणीच असेल. इच्छुकांनी सहभारा नोंदवावा, असे आवाहन एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, एन्व्हारनमेंटल रिसर्च फाऊंडेशन अँड एज्युकेशनलचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या डॉ. रश्मी बोरीकर, निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी केले आहे.

Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता…

- Advertisment -

ताज्या बातम्या