Wednesday, April 24, 2024
Homeनगरलम्पीचा 175 गावांना विळखा; 283 बाधित, 10 मृत्यू वाढले

लम्पीचा 175 गावांना विळखा; 283 बाधित, 10 मृत्यू वाढले

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात शुक्रवारी लम्पी रोगाचे नव्याने 283 जनावरे बाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे लम्पी बाधितांचा आकडा आता 1 हजार 941 झाला असून मृत जनावरांची संख्या 64 झाली आहे. काल एका दिवसात जिल्ह्यात लम्पीमुळे 10 जनावरे दगावली आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात काल 175 गावात लम्पी बाधित जनावरे सापडली असून यामुळे या गावाच्या पाच किलो मीटरच्या परिघातील 883 गावातील जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सध्या तरी पशूसंवर्धन विभागाकडून 9 लाख 97 हजार 223 जनावरांच्या लसीकरणाचे नियोजन असून यापैकी 6 लाख 48 हजार 421 जनावरांचे लसीकरण झालेले ाहे. दुसरीकडे जमेची बाजू म्हणजे जिल्ह्यात 646 जनावरांनी लम्पीवर मात केलेली आहे. पशूसंवर्धन विभागाकडून युध्द पातळीवर लसीकरण सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या