Friday, April 26, 2024
Homeनगर1 लाख लम्पी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध

1 लाख लम्पी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत व जामखेड तालुक्यांसाठी बारामती अ‍ॅग्रो व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यावतीने 1 लाख जनावरांसाठी लम्पी प्रतिबंधात्मक लस मोफत पशूवैद्यकीय रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लम्पीबाबत माहिती पशूपालकांना व्हावी यासाठी कर्जत येथे शिबिराचे आयोजन केले होते.

- Advertisement -

शहरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पशुपालक, दूध संकलक, पशू वैद्यकीय अधिकारी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला क्रांतिसिंह नाना पाटील पशु महाविद्यालय साताराचे अधिष्ठाता डॉ. विलास आहेर, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. मेश्राम व कर्जत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अनभुले यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी आ. रोहित पवार म्हणाले, अफवांवर विश्वास न ठेवता काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या रोगावर नियंत्रण मिळवू शकते. त्यासाठी बाधा झालेल्या जनावरांची इतर जनावरांपासून वेगळी व्यवस्था करावी, चारापाणी इत्यादी वेगळे ठेवावे, त्यामुळे इतर जनावरांना होणारा रोग प्रसार थांबवता येईल. यावेळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकर्‍यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या