Wednesday, April 24, 2024
Homeनगर1 हजार 320 जनावरांच्या भरपाईपोटी तीन कोटींची मदत

1 हजार 320 जनावरांच्या भरपाईपोटी तीन कोटींची मदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात लम्पी संसर्ग रोगाने आतापर्यंत 1 हजार 500 जनावरे मृत पावली आहेत. या मृत्यू झालेल्या जनावरांपोटी पशु पालकांना पशुसंवर्धन विभागाकडून आर्थिक मदत देण्यात येेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 320 मृत जनावरांच्या मालक शेतकर्‍यांच्या मदतीच्या प्रस्ताव मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे पीडित शेतकर्‍यांना सुमारे 3 कोटी भरपाई मिळाली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून लम्पी या संसर्गजन्य रोगाचा फैलाव सुरू झाला आहे. प्रारंभी केवळ उत्तरेतील काही तालुक्यांत असलेला हा संसर्ग हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात पसरला. आजअखेर जिल्ह्यात 24 हजार 224 लम्पी बाधित जनावरे आढळली असून, त्यातील 1 हजार 500 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाने लम्पीने जनावराचा मृत्यू झाल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर समिती नेमून हे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. आतापर्यंत 1 हजार 320 मदतीचे प्रस्ताव समितीने मंजूर केले आहेत. यापोटी राज्य सरकाच्या पशूसंवर्धन विभागाच्यावतीने 2 कोटी 57 लाखांची मदत देण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 34 लाख 98 हजार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे.

अशी आहे मदत

लम्पीने जनावरांचा मृत्यू झाल्यास शासनाने खास बाब म्हणून पशुपालकांना मदत जाहीर केली आहे. त्यानुसार दुभत्या जनावरांना 30 हजार, बैल 25 हजार, तर वासरासाठी 16 हजार रुपयांची मदत दिली जाते. तर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून संबंधीत शेतकर्‍याला 10 हजार प्रती जनावर आणि लहान वासरू यांना प्रत्येकी 2 हजार या प्रमाणे आर्थिक मदत देण्यात येत आहे.

दरम्यान, गुरूवारी लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या आकडा दीड हजार झाला आहे. बुधवारी जिल्ह्यात लम्पीमुळे मरण पावलेल्या जनावरांची संख्या 1 हजार 455 होती. त्या गुरूवारी 45 ची पडल्याने लम्पी मृतांचा आकडा हा आता 1 हजार 500 झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लम्पीची बाधा झालेल्या जनावरांची संख्या ही 24 हजार 224 झाली असून यातील 15 हजार 777 जनावरांनी लम्पी रोगावर मात केली आहे. जिल्ह्यातील 218 गावात सध्या लम्पी रोगाने बाधित जनावरे आहेत. या गावांच्या पाच किलो मीटरच्या टप्प्यात 1 हजार 137 गावे आहेत. पशूसंवर्धन विभागाने आतापर्यंत 14 लाख 98 हजार 416 जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे.

अशी आहे तालुकानिहाय मदत (स्टेट)

अकोले 29 लाख 38 हजार, जामखेड 2 लाख 5 हजार, कर्जत 64 लाख 95 हजार, नेवासा 15 लाख 4 हजार, पारनेर 25 लाख 34 हजार, पाथर्डी 5 लाख 63 हजार, राहाता 10 लाख 2 हजार, शेवगाव 4 लाख 39 हजार, श्रीगोंदा 43 लाख 55 हजार, श्रीरामपूर 7 लाख 93 हजार, संगमनेर 27 लाख 41 हजार, कोपरगाव 30 हजार, नगर 6 लाख 24 हजार, राहुरी 14 लाख 46 हजार असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या