Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालखनौ तिसऱ्या विजयासाठी सज्ज; आज दिल्लीचे तगडे आव्हान

लखनौ तिसऱ्या विजयासाठी सज्ज; आज दिल्लीचे तगडे आव्हान

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आयपीएल १५ मध्ये आज १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (lucknow supergiants) यांच्यात सायंकाळी ७:३० वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर (new mumbai d y patil ground) खेळवण्यात येणार आहे…

- Advertisement -

आजच्या सामन्यातून भारताच्या दोन भविष्यातील कर्णधारांची त्यांच्या नेतृत्व गुणांची कसोटी लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा हुकमी एक्का डेविड वॉर्नर संघात दाखल झाला आहे. डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीमध्ये नव्याने संधी मिळालेला टीम सैफरिट मागील २ सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून त्याला वगळण्यात येऊ शकते.

डेविड वॉर्नर (David Warner) संघात परतल्यामुळे तो पृथ्वी शॉ सोबत सलामीला खेळेल. शिवाय दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा गोलंदाजीचा कणा असलेला एन्रिक नॉरकिया(ainnik norkia) संघनिवडीसाठी उपलब्ध असणार आहे. नॉरकियाला अंतिम ११ मध्ये संधी मिळाल्यास रोवमन पॉवेल किंवा मुस्ताफिझूर रहेमानला संघातून वगळलं जाऊ शकतं.

युवा अष्टपैलू ललित यादवचा (all rounder lalit yadav) मागील २ सामन्यांमधील कामगिरीमुळे आत्मविश्वास दुणावलेला आहे. मात्र मंदीपसिंग (mandeep sing) अद्यापही आपल्या फलंदाजीतून अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात सपशेल अपयशी ठरलाय ही संघासाठी चिंतेची गोष्ट आहे.

लखनौ संघाबद्दल सांगायचे झाल्यास, मार्कस स्ट्रोइनीसच्या आगमनाने लखनौ संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. अँड्रू टाय किंवा इविन लुईसच्याजागी त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

अष्टपैलू जेसन होल्डरने (all rounder jesan holder) मागील हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात ३ महत्वपूर्ण विकेट्स काढल्या. तसेच कर्णधार लोकेश राहुल (Lokesh Rahul) लयीत परतला आहे. मागील ३ सामन्यांमध्ये लखनौकडून खेळताना आयुष बादोनि (Aaush Badoni) आणि अष्टपैलू दीपक हूडाने (all rounder deepak hudda) आपल्या आक्रमक फलंदाजीतून प्रतिस्स्पर्धी संघांवर दडपण टाकून संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. आवेश खानवर (Avesh Khan) लखनौ संघाच्या गोलंदाजीची मदार असणार आहे.

– सलील परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या