Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशदिवाळीच्या पहिल्याचं दिवशी महागाईचा धमाका!

दिवाळीच्या पहिल्याचं दिवशी महागाईचा धमाका!

दिल्ली | Delhi

सर्वसामान्य दिवाळीवर (Diwali) चांगलीच संक्रांत आली आहे. महिन्याच्या आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल (petrol), डिझेलसह (disel) एलपीजी गॅस (LPG Gas) दरवाढीच्या बातमीने सर्वांवर मोठा बॉम्ब फुटला आहे.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेल दरवाढ आता सर्वसामान्यांना नित्याचीच बाब होऊन बसली आहे. त्यातच आज एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) ३५ पैशांनी वाढले आहे. एलपीजी गॅसची वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे.

दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत १५ रुपयांनी वाढवली होती.

दरम्यान देशात पेट्रोल डिझेल दरांनी नवा उच्चांक नोंदवला. नव्या दरांनुसार राजधानी दिल्लीत पेट्रोल, डिझेल अनुक्रमे १०९.६९ रुपये आणि ९८.४२ रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. तर हेच पेट्रोल, डिझेल मुंबई शहरात अनुक्रमे ११५.५० रुपये आणि १०६.६२ प्रति लीटर दराने विक्री केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या