Friday, April 26, 2024
Homeनगरहमी भावापेक्षा कमी भावात हरबर्‍याची खरेदी

हमी भावापेक्षा कमी भावात हरबर्‍याची खरेदी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

रब्बी हरबर्‍याची (Gram) काढणी सध्या सुरू आहे. आवक वाढल्याने हमी भावापेक्षा (Guaranteed price) कमी दरात हरभर्‍याची खरेदी सुरु आहे. खरेदी केलेल्या शेतीमालाची क्विंटलमागे एक किलोची घट (Decrease) धरून खरेदी होत असल्याने दिवसाढवळ्या शेतकर्‍यांच्या खिशावर दरोडा (Robbery) टाकण्याचे काम व्यापारी करत असल्याने शेतकर्‍यांमधून संताप (Anger from Farmers) व्यक्त होत आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी मान्सूनच्या पावसाने बर्‍यापैकी साथ दिल्याने खरिपाबरोबर (Kharip) रब्बीची पिकेही (Rabbi crops) बर्‍यापैकी झाली आहेत. त्यामध्ये हरबरा पिकाचे (Gram Crops) प्रमाण बर्‍यापैकी आहे. मात्र बर्‍यापैकी उत्पन्न व मार्च एन्डची अडचण यामुळे बाजारात हरबरा विक्रीची (Gram Sales) आवक वाढली आहे. आवक वाढल्याने हरबर्‍याची हमी भावापेक्षा कमी दरामध्ये खरेदी होत आहे. केंद्र सरकारने (Central Government) हरबर्‍यासाठी 5 हजार 200 प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात व्यापार्‍यांकडून 4400 ते 4500 दरम्यान खरेदी सुरू असल्याने शेतकर्‍यांना क्विंटलमागे 700 रूपयापर्यंत फटका बसत आहे. त्यातच कोणताही शेती माल खरेदी केल्यावर व्यापार्‍यांकडुन प्रति क्विंटल एक किलो कटला म्हणून वजा केला जात आहे.

शेती मालात खडा, माती, कांडी असेल तर हा एक किलोचा काटला ठीक असतो मात्र साफ सुथर्‍या शेती मालालाही हाच नियम लागत असल्याने व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांच्या खिशावर दिवसा दरोडाच टाकला जात असल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. अशा पध्दतीची सुलतानी कपात बंद करण्यासाठी राहाता बाजार समितीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यावर्षीही राहात्यात हरबरा हमीभाव केंद्र नाही

शासनाकडून हमी भावात हरबर्‍याची खरेदी होत आहे. मात्र चालू वर्षीही राहाता तालुक्यात हरबरा हमी भाव केंद्र सुरू झालेले नाही. हमीभावात हरबरा विकायचा असेल तर राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांना राहुरीला जोडण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या