Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'लव्ह जिहाद'वरून राजकीय वातावरण तापलं

‘लव्ह जिहाद’वरून राजकीय वातावरण तापलं

दिल्ली | Delhi

भाजपा शासित काही राज्यांमध्ये लव जिहादच्या घटना आळा घालण्यासाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रातही कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. चर्चेत असलेल्या लव जिहाद प्रकरणावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

खासदार ओवेसी यांनी म्हंटल आहे कि, “विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम १४ व २१ मोठं उल्लंघन होणार आहे. त्यांनी (भाजपा) घटनेचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार आता काम करणार नाही.” तसेच “बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय,” अशा शब्दात ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

तसेच भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आंतरधार्मिक विवाह केले असतील, त्यांच्यावर लव्ह जिहाद कायद्यानुसार कारवाई होणार का?, असा प्रश्न बघेल यांनी उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आंतरधर्मिय विवाह केलेले आहेत, असे म्हणत ही मंडळी लव्ह जिहादच्या व्याख्येत बसतात की नाही, असा प्रश्न बघेल यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतर करण्यावर अंकुश लावण्यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केल्यानंतर काग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे हे वक्तव्य आले आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांमध्ये लव्ह जिहादची प्रकरणे वाढली असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. या आधारावर लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याचा विचार उत्तर प्रदेश सरकारने केल्याचे बोलले जात आहे. ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणण्यासाठी तशी प्रक्रिया सुरू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या