Saturday, April 27, 2024
Homeनाशिकभातशेतीचे नुकसान

भातशेतीचे नुकसान

मुरुमटी । वार्ताहर Peth / Murmati

पेठ तालुक्यात सद्या हळी भाताची सोंगणी अंतिम टप्प्यात आली असून परतीच्या पावसाने सोंगणी केलेले पीक भिजलेल्या अवस्थेत आहे.

- Advertisement -

उन्हाचा तडाखा मिळताच क्षणी आम्ही मळणी, साठवण करून घेण्यास धावपळ करतो आहे. मात्र तात्काळ पीक पाहणी करून शेतीपिकांचे पंचनामे करावेत व सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

पेठ तालुक्यासह परिसराला सलग दोन दिवस परतीच्या पावसाने झोडपून काढले.यामुळे सोंगणी केलेल्या व उभ्या असलेल्या भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.गेल्या आठवड्यातही पावसाने हजेरी लावून शेतकर्‍यांना नुकसानबाधित केले आहे.

सद्या बदलत्या वातावरणामुळे आणि पूर्णतः पिकलेल्या भात पिकांच्या अवस्थेत शेतकर्‍यांना सोंगणी करण्यावाचून पर्याय नसल्याने शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे. तसेच काही शेतकरी मळणी यंत्राच्या सहाय्याने शेताच्या बांधावर मळणी करून घेत आहेत,तर काही शेतकरी साठवण करून ठेवण्याकडे कल झुकवीत आहे.हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने कचाट्यात सापडला असून शेतकर्‍यांच्या डोळ्यासमोर मातीमोल होत असल्याने जीव कासावीस होत आहे.

सद्या सोंगणी केलेले भात पीक भिजलेल्या अवस्थेत आहे.उन्हाचा तडाखा मिळता क्षणी शेतकरीवर्ग उभ्या असलेल्या पिकाला फाटा देत सोंगणी केलेल्या भाताची मळणी,अथवा साठवणीवर भर देत असतो यामुळे नुकसान बाधित शेतकर्‍यांचे तातडीने पीक पाहणी करुन पंचनामे करावे, सरसकट नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतीमालास हमीभाव देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या