Friday, April 26, 2024
Homeनाशिकभगवान अरिहंत मूर्तीशिलेचे खा. डॉ. पवार यांच्या हस्ते पूजन

भगवान अरिहंत मूर्तीशिलेचे खा. डॉ. पवार यांच्या हस्ते पूजन

उमराणे | प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील मालसाने येथील नमोकार तीर्थावर राष्ट्रसंत सारस्वताचार्य देवनंदीजी गुरुदेव यांच्या संकल्पनेतून साकरण्यात येणाऱ्या अरिहंत भगवान मूर्तीसाठी ३६४ टन वजनाची अखंड शिलेचे आगमन झाले या भव्य शिलेचे पूजन खा. डॉ भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुवली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्यासाठी कर्नाटकमधील बेंगलोरजवळच्या देवनहळ्ळी येथून हा ३६४ टन वजनाचा क्रिम कलरचा ग्रेनाईड पाषाण १६६ चाकांच्या ट्रकमधून आणण्यात आला.

यावेळी अध्यक्ष नीलम अजमेरा ,महावीर गँगवाल,संतोष काला , चांदवड जैन समाजाचे अध्यक्ष नरेंद्र कासलीवाल, उपाध्यक्ष सुभाष अजमेरा, प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जव्हारलाल संकलेचा, ईश्वरलाल बाफना, मांगीलाल कासलीवाल, केशरचंद पाटणी, मोहनलाल अजमेरा, राजेंद्र कासलीवाल, राजेंद्र अजमेरा, दर्शन अजमेरा, शांतीलाल कासलीवाल, वर्धमान पांडे, प्रवीण कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, संजय महाजन, योगेश अजमेरा, अल्केश अजमेरा, सुनील डूंगरवाल, पराग कासलीवाल यांनी सामूहिक शांतीमंत्राचे पठण केले.

या वेळी अशोक व्यवहारे, पूनम संचेती,गोरख ढगे, कांदा व्यापारी सुनिल दत्तू देवरे ,पप्पू हेडा, निलेश काळे ,महेंद्र कंक्रेज, शरद बोराडे, राजू विरार, नितीन फंगाळ, मोबिन खान उपस्थित होते. नमोकार तीर्थ उभारण्यात मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे खा पवार यांनी सांगितले ब्रम्हचारी वैशालिदीदी यांच्या हस्ते खा.भारतीताई पवार व मान्यवरांचा यांचा सत्कार करण्यात आला राकेश जैन यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या