Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारलोणखेडा ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

लोणखेडा ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

शहादा | ता.प्र.- NANDURBAR

तालुक्यातील लोणखेडा ग्रामपंचायतीला आय. एस. ओ मानांकन मिळाले आहे. लोणखेडा ग्रामपंचायत तालुक्यातील दुसरी आय.एस.ओ ग्रामपंचायत आहे.

- Advertisement -

लोणखेडा ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण दिल्लीतील संस्था पातळीवर नुकतेच करण्यात आले. यानंतर या ग्रामपंचायतीला शहादा गटविकास अधिकारी रागवेंद्र घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. गोसावी, विस्तार अधिकारी सुरेश देवरे, श्री.बेलदार यांच्या हस्ते आय.एस.ओ.

मानांकनाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यामुळे लोणखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा आहे.

येथील ग्रामस्थांना मुलभूत व प्राथमिक सेवा सुविधा पुरविण्याचे काम लोणखेडा ग्रामपंचायतीकडून होत आहे.

आय.एस.ओ. मानांकनाचे प्रमाणपत्र स्विकारते वेळी सरपंच शांताबाई भिल, उपसरपंच कल्पना पाटील, माजी उपसरपंच अशोक पाटील, ग्रामसेवक दिनकर नाईकनवरे उपस्थित होते. आय.एस.ओ मानांकन पथकाने केलेल्या पाहणीत लोणखेडा ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत,

नियमीत दप्तर व आर्थिक तपासणी, प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाडया, शैक्षणिक सेवासुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य आदी सेवासुविधा आदिंची पाहणी करुन गुणांकन ठरविले जाते. ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून गावाचा सर्वांगिणदृष्ट्या विकास साधला आहे.

ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकीही जपत केलेले कार्य व राबविलेले लोकोपयोगी उपक्रम, तसेच शासकीय कामातील सहभाग वाखाणण्याजोगा राहिला आहे. येथील नागरीकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायतीने शासन योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली. येथील नागरीकांना उत्तम सुविधा पुरविल्या जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या