Friday, April 26, 2024
Homeनगरलोणी व्यंकनाथमध्ये हत्यारबंद मोबाईल चोरांचा धुमाकूळ

लोणी व्यंकनाथमध्ये हत्यारबंद मोबाईल चोरांचा धुमाकूळ

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील लोणी व्यंकनाथमधील एका लिंबू व्यापार्‍याकडे कामाला असलेल्या परप्रांतीय तरुणाच्या राहत्या घरात घुसून तालुक्यातील बागायत

- Advertisement -

गावातील चोरट्यांनी मोबाईल चोरीचा प्रयत्न केला. मात्र ज्यांची चोरी झाली त्यांनी आरडाओरडा केल्याने गाव जागे झाले त्यात नगरचे गस्तीवर असलेले पोलीस पथक देखील घटनास्थळी आले होते. अंधारात चोरटे फरार झाले पण त्यांच्याकडील एक नवी पल्सर गावकर्‍यांना सापडली त्यांनी ती श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात दिली आहे.

दिनांक 9फेब्रुवारी रोजी अंधारात लोणी गावातील रस्त्याच्या कडेला लिंबू काट्यावरील कामाला असणार्‍या तरुणाच्या खोलीत घुसून मोबाईल चोर मोबाईल घेऊन पसार झाले. यात या चोरट्यांना विरोध केला म्हणून त्यांनी एक परप्रांतीय तरुणाला कोयता मारून चोरटे पसार झाले.त्यानंतर आरडा ओरड केल्यावर गावातील तरुण जागे झाले त्यांनी चोरट्यांचा शोध घेतला मात्र अंधारात चोर सापडले नाही. नगरचे गस्ती पथक देखील आले होते.यावेळी चोरट्यांची नवी पल्सर गाडी सोडून चोर पळाले .चोरट्यांची ही दुचाकी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

दरम्यान, लोणी व्यंकनाथ गावात मोबाईल चोरी करणारे हे जवळच्या एक गावातील असल्याचा संशय गावातील काहींनी व्यक्त केला.ही नवी पल्सर गाडी कुणाची आहे यावर देखील या चोरांचा तपास लागणार आहें.

- Advertisment -

ताज्या बातम्या