Saturday, April 27, 2024
Homeनगरलोणी व्यंकनाथला एटीएम फोडून लाखोची रोकड लंपास

लोणी व्यंकनाथला एटीएम फोडून लाखोची रोकड लंपास

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील एसबीआय बँकेचे एटीम गॅस कटरच्या सहय्याने कापून त्यातील लाखो रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नल्याची घटना शनिवारी (दि.8) पहाटे घडली.

- Advertisement -

लोणी व्यंकनाथ येथिल यात्रा झाली असताना गावात असलेल्या एसबीआय बँकेचे एटीम फोडून चोरी झाली याबाबत शेजारी असलेल्या दुकानदाराने सकाळी आपले दुकान उघडल्यावर त्याचे हे लक्षात आल. याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक माळी व पोलीस कर्मचारी बडे व शिरसाठ यांनी भेट दिली आहे. यात्रेचा दुसरा दिवस आहे. सर्वत्र मोठया प्रमाणावर गर्दी आहे.

काल मध्य रात्रीपासून आज सकाळ दरम्यान ही घटना घडली आहे. यात चोरी करतांना चोरट्याने सायरनची वायर कट केली .या नंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची दिशा दुसरीकडे केली. आणि गॅस कटरच्या सहाय्याने एटीम मशीन कापली व त्यातुन अंदाजे 31 लाख रूपयांच्या आसपास रक्कम चोरीस गेल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. याबाबत उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यापूर्वी अश्याच पद्धतीने तीन ते चार वेळा याच बँकेचे एटीएम फोडून चोरी झालेली आहे. तरिही याच्या सुरक्षेबाबात उपायोजना केल्या जात नसल्याने नागरीकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या