Wednesday, April 24, 2024
Homeनगरलोणीतील स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहकांची होते कुचंबना !

लोणीतील स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहकांची होते कुचंबना !

राजुरी |वार्ताहर| Rajuri

करोना व दिवाळी सणाच्या काळात भारतीय स्टेट बँकेच्या लोणी शाखेने कायमच ग्राहकांची थट्टा करण्याचाच प्रयत्न सातत्याने सुरू ठेवला

- Advertisement -

असून स्वत:चे पैसे काढण्यासाठी ग्राहकांना बँकेतील कॅश काऊंटरवरील महिला कर्मचार्‍यांकडून अरेरावी सहन करावी लागत असल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळी सणानिमित्ताने लोणीतील बाजारपेठ फुललेली असताना लोणीतील स्टेट बँकेच्या ग्राहकांना बँकेच्या कर्मचार्‍यांकडून अरेरावी व मानसिक छळाचा सामना करावा लागत आहे… तुम्ही खाली ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढा बँकेत कशाला येता, खाली जा असे सुनावले जाते…

दिवाळी सणानिमित्ताने लोणीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी लगबग सुरू आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बँकेतून आपलेच पैसे काढण्यासाठी बँकेतील कर्मचार्‍यांकडून प्रसंगी बोलणेही ऐकावे लागत आहे.

पैसे काढण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात लोणीतील भारतीय स्टेट बँकेत जातात. वृध्द नागरिकांचे शासकीय डोलाचे पैसे, विद्यार्थी स्कॉलरशिप, व अन्य नागरिक येत असतात. बँकेत पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहून नंबर लावल्यास पैसे देणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्याकडून सांगण्यात येते की तुम्ही खालील ग्राहक सेवा केंद्रात पैसै काढा, आमच्याकडे 20 हजार रुपयांच्या पुढील पैसे भेटतात व भरता येतात.

बँकेत कुठल्याही प्रकारे गर्दी न करता बँकेतील कर्मचारी बसून असतात. सर्वांना खालील ग्राहक सेवा केंद्रात पाठवून गर्दी निर्माण केली जाते. ग्राहक सेवा केंद्रात प्रसंगी पैसे नसतात. त्यामुळे दुसरा ग्राहक पैसे भरण्यास आल्यावर व भरणा झाल्यावर सदर ग्राहकाला पैसे दिले जातात.

परंतु नागरिक ग्राहक सेवा केंद्रात गेल्यास तेथेही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसत नाहीच परंतु त्या ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांना देण्यासाठी पैसेही उपलब्ध नसतात.

त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून कॅश काउंटरवरील महिला कर्मचार्‍यास समज देऊन सर्व ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पैसे देण्या संदर्भात सूचीत करावे,अशी ग्राहकांमध्ये प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या