Friday, April 26, 2024
Homeनगरलोणी पोलीस ठाण्यातील 103 दुचाकींचा होणार लिलाव

लोणी पोलीस ठाण्यातील 103 दुचाकींचा होणार लिलाव

लोणी |वार्ताहर| Loni

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून लोणी पोलीस ठाण्याच्या आवारात धूळखात पडलेल्या बेवारस 103 दुचाकींचा अखेर लिलाव करण्याचे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, लोणी पोलिसांना बेवारसपणे मिळालेल्या विविध कंपन्यांच्या दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून पडून होत्या.त्यांच्या मालकांचा शोधही घेतला मात्र कुणीही मालक न सापडल्याने त्या अनेक वर्षे तशाच पडून होत्या.त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली.त्यांचे चेसी नंबर सुद्धा वाचता येत नाहीत. राहाता तहसीलदार यांच्या आदेशानुसार आता या दुचाकींचा लिलाव करण्यात येणार असून लिलावात सहभागी होऊ इच्छिणार्‍या व्यक्तींनी 26 ऑक्टोबरपर्यंत लोणी पोलीस ठाण्यात निर्धारित रक्कम भरून नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान सर्वच पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने दुचाकी व काही चारचाकी वाहने वर्षानुवर्षे पडून असल्याचे चित्र महाराष्ट्रभर बघायला मिळते. मात्र त्यांचे मालक सापडत नाहीत. अनेक दुचाकी उत्तम स्थितीत असताना ते चोरी झालेले असतात. चोरट्यांकडून हस्तगत झालेल्या व काही बेवारसपणे सोडून दिलेल्या दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात पडून राहतात. धूळ, ऊन आणि पाऊस यांचा अनेक वर्षे सामना करताना या दुचाकींची बिकट अवस्था होते. त्यांचे करायचे काय? असा प्रश्न पोलिसांना पडतो. मात्र अलीकडे आशा दुचाकींचा लिलाव करण्याचा निर्णय झाल्याने आता पोलीस ठाण्याच्या आवारातून या दुचाकी बाहेर गेल्यावर ठाण्याचा परिसर मात्र मोकळा श्वास घेऊ शकेल हे मात्र नक्की.

- Advertisment -

ताज्या बातम्या