Wednesday, April 24, 2024
Homeनगरलोणी खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रभाताई घोगरे विजयी

लोणी खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रभाताई घोगरे विजयी

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सरपंच जनार्दन घोगरे गटाच्या युवा परीवर्तन मंडळाच्या प्रभाताई घोगरे विजयी झाल्या आहेत.

- Advertisement -

लोणी खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक सहा महिन्यांपूर्वी झाली होती. यात एकनाथ घोगरे गटाने बहुमत मिळवत सरपंचपदी जनार्दन घोगरे विराजमान झाले होते. मात्र जनार्दन घोगरे निवडणुकीत दोन जागांवर विजयी झाल्याने त्यांनी प्रभाग दोन मधील जागेचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाचे उमेदवार डॉ. किरण आहेर व घोगरे गटाच्या युवा परीवर्तन मंडळाच्या प्रभावती घोगरे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. यामध्ये बाजी मारत घोगरे गटाच्या प्रभावती घोगरे यांनी विजय संपादन केला आहे.

यात डॉ. किरण आहेर यांना 1248 मते मिळाली तर प्रभावती घोगरे यांनी 1428 मते मिळवत 180 मतांनी विजय संपादन केला. प्रभाताई घोगरे या विद्यमान सरपंच जनार्दन घोगरे यांच्या पत्नी असून माजी आ. स्व. चंद्रभान दादा घोगरे यांच्या स्नुषा आहेत. लोणी खुर्दमध्ये प्रथमच पती पत्नी दोघांनाही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रभाताई घोगरे यांनी विजयी सभेत सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या