Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरलोणी- गोगलगावात प्रत्येकी पाच करोना बाधित

लोणी- गोगलगावात प्रत्येकी पाच करोना बाधित

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द व गोगलगावमध्ये सोमवारी प्रत्येकी पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले. गोगलगावमध्ये शनिवारी करोनाने शिरकाव केला होता.

- Advertisement -

लोणी खुर्द गावात करोनाचा बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.सोमवारी गावातील साई कॉलनीतील तीन,श्रीराम नगर मधील एक व दिघे वस्तीवरील एक अशा पाच व्यक्तींना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. लोणी बुद्रुक आणि खुर्द गावातील बाधितांची संख्या 75 वर पोहचली आहे.

लोणी जवळच्या गोगलगावात शनिवारी करोनाने शिरकाव केला. गावातील एक व्यक्ती व त्याची पत्नी बाधित आढळून आली. दोन दिवसांतच गावातील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.या गावात सध्या सात जण बाधित आहेत.

करोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत, मास्कचा चुकीच्या पद्धतीने वापर, सोशल डिस्टन्सिंगचे होत नसलेले पालन,भाजीपाला आणि किराणा दुकानात होत असलेली गर्दी यामुळे हा संसर्ग वाढत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या