Friday, April 26, 2024
Homeनगरलोणी पोलिसांच्या ताब्यातील आरोपींचा सिव्हिलमध्ये धिंगाणा

लोणी पोलिसांच्या ताब्यातील आरोपींचा सिव्हिलमध्ये धिंगाणा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोणी पोलिसांच्या ताब्यातील दोन आरोपींनी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात धिंगाणा घातला. डॉक्टरांनी अ‍ॅडमिट करून घ्यावे, असा हट्ट करत त्यासाठी डोकं आपटून घेऊन स्वतःला जखमी करून घ्यायचा प्रयत्नही केला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

- Advertisement -

खून व दरोड्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या अक्षय दत्तात्रय बनसोड व शाहरूख सत्तार खान या दोन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. लोणी पोलीस ठाण्याचे अंमलदार अशोक शिंदे, तमनर व पठारे हे त्यांना घेऊन आले होते. डॉक्टरने तपासणी केल्यानंतर त्यांना परत नेण्यास सांगण्यात आले. मात्र या आरोपींना जेलमध्ये पुन्हा न जाता रूग्णालयातच काही दिवस उपचाराच्या नावाखाली थांबायचे होते. त्यामुळे त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. एकाने भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेण्याचाही प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या