Friday, April 26, 2024
HomeUncategorized'या' आहेत देशातील सर्वात लांब नद्या!

‘या’ आहेत देशातील सर्वात लांब नद्या!

नाशिक | प्रतिनिधी

भारतामध्ये सर्वाधिक नद्या आहेत यामुळे भारताला नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते. भारतातल्या सर्वात लांब नद्यांमध्ये गंगा ही नदी सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. तर हीच गंगा जगात तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. भारताची नव्वद टक्के नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात म्हणजेच या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. तर उर्वरित नद्या या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजेच या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात…

- Advertisement -

गंगा : २ हजार ५२५ किमी लांब आहे. सर्वात पवित्र नदी म्हणून ओळख. ही नदी देवी म्हणून ओळखली जाते. उत्तराखंडमधील गंगोत्री ग्लेशियरकमधून उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातून ही नदी वाहते.

गोदावरी : १ हजार ४६४ किमी लांब आहे. गोदावरी भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. ही नदी हजारो वर्षांपासून हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूजनीय आहे. समृद्ध सांस्कृतिक वारसा ही जोपासत आहे. गोदावरी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. या नदीला “दक्षिण गंगा” म्हणून ओळखले जाते. ही नदी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, नाशिक येथून उगम पावते आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून वाहते. शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

यमुना : १ हजार ३७६ किमी लांब ही नदी आहे. ही नदी गंगा नदीची उपनदी आहे. ही नदी उत्तराखंडच्या उत्तर काशीतील बंदर पूछच्या शिखरावर यमुनोत्री हिमनदीपासून उगम पावली आहे. ही नदी उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून वाहते.

नर्मदा : १ हजार ३१२ किमी लांब ही नदी आहे. ही नदी रेवा म्हणून ओळखली जाते, प्रायद्वीपीय भारतातील सर्वात मोठी आणि पश्चिम दिशेला वाहणारी नदी आहे. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक डोंगरावर झालाय. देशातील सात पवित्र नद्यांपैकी एक ही नदी आहे. ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते.

कृष्णा : १ हजार ३०० किमी लांब ही नदी आहे. ही नदी कृष्णवन म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील पश्चिम घाटातून ही नदी उगम पावते. ही नदी भारतातील सर्वात महत्वाच्या द्वीपकल्पातील नद्यांपैकी एक आहे, जी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमधून वाहते आणि शेवटी आंध्र प्रदेशातील बंगालच्या उपसागरात विलीन होते.

सिंधू : १ हजार ११४ किमी लांब ही नदी आहे. ही नदी प्राचीन सिंधू संस्कृतीचे जन्मस्थान आहे. या नदीला एक ऐतिहासिक महत्व आहे. सिंधू नदी मानसरोवर तलावापासून उगम पावते आणि लडाख, गिलगिट आणि बलुचिस्तानपर्यंत वाहते. सिंधू नदीच्या काही प्रमुख उपनद्यांमध्ये काबूल, झेलम, चिनाब, रवी, बियास आणि सतलज नदीचा समावेश आहे.

ब्रम्हपुत्रा : ९१६ किमी लांब ही नदी आहे. भारताच्या प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे ब्रम्हपुत्र. तिबेटमधील हिमायलातील अंगसी हिमनदीपासून ही उगम पावली आहे. येथे याला यार्लंग त्संगपो नदी म्हणून ओळखले जाते. या नदीला आसामची जीवनरेखा म्हणून ओळखले जाते.

महानदी : ८९० किमी लांब ही नदी आहे. महानदी हे दोन संस्कृत शब्द महा (महान) आणि नदी (नदी) यांचा एक संयुग आहे. छत्तीसगडच्या सिहावा पर्वतात नदी उगम पावते आणि ओडिशा राज्यातून वाहते. जगातील सर्वात मोठे मातीचे धरण ओडिशाच्या संबलपूर शहरालगत महानदी नदीवर हिराकूड धरण बांधले गेले आहे.

(Info & Photo Credit : Wikipedia)

- Advertisment -

ताज्या बातम्या