Saturday, April 27, 2024
Homeनगरसायकलपटू डॉ. थोपटेंनी इंग्लंडमध्ये उंचावले नगरचे नाव

सायकलपटू डॉ. थोपटेंनी इंग्लंडमध्ये उंचावले नगरचे नाव

अहमदनगर | प्रतिनिधी

इंग्लडमध्ये मानाची समजल्या जाणाऱ्या लंडन-एडीनबर्ग-लंडन (LEL) ही १५४० किलोमीटरची खडतर सायकल स्पर्धा नगरच्या डॉ. ओंकार थोपटे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या रूपाने नगरच्या सायकलींग क्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला आहे.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये दरवर्षी होत असलेली ही स्पर्धा करोनामुळे दोन वर्ष खंडित झाली होती. यावर्षी 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान आयोजित केलेल्या या स्पर्धेत भारतातील 150 सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. त्यातील 117 पटूंनी ही राईड पूर्ण केली. ही राईड पाच दिवसांत पूर्ण करायची असते. १२५ तासांत हि राईड पूर्ण करणे एक मोठे आव्हान असते. या राईडदरम्यान नाश्ता, जेवण करण्यासही वेळ नसतो.

डॉ. थोपटे हे cardiologist असून ते अहमदनगर येथील विखे पाटील हॉस्पिटल येथे व पुणे येथे प्रॅक्टिस करतात. गेले ४-५ वर्षापासून ते सायकलिंग करत असून अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य आहेत. या आधी त्यांनी गोवा, Statue of Unity इत्यादी राईड केल्या आहेत. ते SR झाले असून त्यांनी १००० किमीची दोन राईड भारतात यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या राईडमध्ये नगरचे शरद काळे हे सायकलपटूही सहभागी झाले होते.

अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन तर्फे त्यांच्याशी सर्व कोअर मेंबर्सनी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. अहमदनगरवासीय व अहमदनगर सायकलिस्ट यांना ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे. कोअर मेंबर उपाध्यक्ष नितीन पाठक, सचिव अमोल कुलकर्णी, मनोज येनगंदुल, केतन बलदोटा, नागेश धसाळ, योगेश खरपुडे, CA भंडारी, आशिष तत्तू, सुवर्णा मुळे, व वैष्णवी पाठक यांनी व्हिडिओ कॉल करून त्यांचे जोरदार अभिनंदन केले. भारत माता की जय, वंदे मातरम्, अहमदनगर सायकलिस्ट झिंदाबाद या घोषणामुळे सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला.

अतिशय खडतर अशा स्पर्धेत डॉ.थोपटे यांनी यश मिळवून अहमदनगर सायक्लिस्टच्या इतिहासात हा अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन! अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन च्या प्रयत्नाला यश येऊन गेल्या काही वर्षापासून नगर मध्ये सायकलिंग चांगले रुजत आहे. त्याचा खेडोपाडी प्रसार होत आहे. अशा विक्रमामुळे या सायकल प्रसाराला निश्चितच चालना मिळेल.

चंद्रशेखर मुळे (अध्यक्ष, अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन)

- Advertisment -

ताज्या बातम्या