Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रलोणार सरोवर 'रामसर पाणथळ साईट' म्हणून घोषित

लोणार सरोवर ‘रामसर पाणथळ साईट’ म्हणून घोषित

मुंबई | Mumbai

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

- Advertisement -

तर देशातील ४१ वी ‘रामसर पाणथळ साईट’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वन विभागाचे अभिनंदन करण्यात आले आहे.

लोणार सरोवर परिसर निसर्ग पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झाली चर्चा करण्यात आली.

रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड या आंतरराष्ट्रीय संस्थेने याची घोषणा केली आहे. मागील दहा वर्षांपासून या संदर्भात सदर आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठपुरावा चालू होता. त्यानंतर जुलै 2020 मध्ये याबाबत अंतिम कागदपत्रे सादर करण्यात आली होती. याधारे लोणार सरोवर ही जागतिक रामसर साईट म्हणून घोषित झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या