Wednesday, April 24, 2024
Homeनगरलोकसेवा विकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन

लोकसेवा विकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन

श्रीरामपूर |Shrirampur

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच मंजूर असलेल्या खडीकरण व डांबरीकरणाची कामे आजपासून सुरू करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन गुजरे व जि.प.बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. एस. भालेराव यांच्या लेखी आश्वासनानंतर याप्रश्नी लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेले रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढलेले असून काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सदर रस्त्यांच्या कामाची दुरुस्ती तसेच मंजूर असलेली कामे विनाविलंब सुरू करावी या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने श्री. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली अशोकनगर फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी, अंबादास आदिक, मंजुश्री मुरकुटे, प्रा. सौ. सुनीता गायकवाड, अशोकचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, काशिनाथ गोराणे, दिगंबर शिंदे, अशोक बँकेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड्. सुभाष चौधरी, बाबासाहेब काळे, नाना पाटील, प्रतापराव राजेभोसले आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.मुरकुटे म्हणाले की, राज्यात सर्वत्र आंदोलने, मेळावे, सभा, शासकीय कार्यक्रम सुरू असताना आमच्या आंदोलनासच प्रतिबंध का? याचे उत्तर द्यावे. आम्ही पोलीसांना आंदोलनाबाबत पूर्वसूचना व निवेदन दिलेले आहे. त्यामुळे आपले रास्तारोको आंदोलन शांततेच्या मार्गाने होणारच, असे सांगून श्री.मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठाण मांडले. आपण आमदार असताना रस्त्यांची वरचेवर डागडुजी, दुरुस्ती तसेच देखभाल करण्यात येत होती. त्याचप्रमाणे रस्त्यांची कामेही दर्जेदार व टिकाऊ स्वरुपाची होती. आता मात्र रस्त्यांची दुर्दशा झाली असून वाहने चालविणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी कोणत्याही सबबी न सांगता विनाविलंब कामे सुरू करावीत. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी श्री. मुरकुटे यांनी मागणी केल्यानुसार रस्त्यांची कामे उद्यापासून (मंगळवार ता.19) तात्काळ सुरू केली जातील, असे लेखी आश्वासन दिले.

सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानुसार श्रीरामपूर ते नेवासा रस्ता, श्रीरामपूर ते बाभळेश्वर रस्ता, श्रीरामपूर ते बेलापूर रस्ता व श्रीरामपूर-उंदिरगाव ते नाऊर रस्ता या रस्त्यांचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण तसेच अशोकनगर फाटा ते कारेगाव रस्ता (दुरुस्ती, खडीकरण व डांबरीकरण), अशोकनगर-मातापूर ते मालुंजा रस्ता (खडीकरण व डांबरीकरण), कारेगाव-भेर्डापूर ते पाथरे रस्ता (खडीकरण व डांबरीकरण), कारेगाव हद्दीतील जगताप वस्ती रस्ता (मोरी, भराव, खडीकरण व डांबरीकरण), अशोकनगर ते कारेगाव रस्ता (खडीकरण व डांबरीकरण), निमगावखैरी ते नाऊर रस्ता (खडीकरण व डांबरीकरण) आदी कामे सुरु करण्यात येणार आहेत. सदरची कामे करण्याचे लेखी आश्वासन प्राप्त झाल्याने रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. मुरकुटे यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यादरम्यान तहसीलदार प्रशांत पाटील हे बैठकस्थानी होते. तसेच सदरची कामे सुरू करून पुढील पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी भाऊसाहेब उंडे, आदिनाथ झुराळे, दत्तात्रय नाईक, दिगंबर तुवर, अभिषेक खंडागळे, निरज मुरकुटे, बाळासाहेब दांगट, अ‍ॅड्.डी.आर.पटारे, गणेश भाकरे, राम पटारे, चंद्रभान पवार, रामदास पटारे, भगत राऊत, अनिल जोशी, अमोल पटारे, बाबजी ढोकचौळे, बाळासाहेब शिंदे, कल्याण लकडे, बाबासाहेब आदिक, पांडुरंग शिंदे, मच्छिंद्र भोसले, आबासाहेब गवारे, रामभाऊ कसार, भागवतराव पवार, महेश पटारे, भाऊसाहेब दोंड, आशिष दोंड, निलेश कुंदे, युनूस पठाण, मिराबाई पारधे, दत्तात्रय हळनोर, सखाराम पारखे, जगन्नाथ बिडगर, शिवाजी गायकवाड, दशरथ पिसे, शनेश्वर पवार, अरुण हळनोर, पोपट कांबळे, शिवाजी मुठे, सुभाष मुठे, माणिकराव पवार, विश्वास क्षीरसागर, अशोक कारखान्याचे संचालक मंडळाचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप व त्यांच्या सहकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त राखला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या