Friday, April 26, 2024
Homeनगरएकदिवशीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

एकदिवशीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

भेंडा (वार्ताहर)-

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने दि. 29 नोव्हेंबर रोजी प्रतिदिन

- Advertisement -

7000 मेट्रिक टन गाळप क्षमतेवर 9360 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून एकदिवसीय गाळपातील नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.कारखान्याने दि.29 नोव्हेंबर अखेर एकूण 2 लाख 57 हजार 245 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 2 लाख 17 हजार 500 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

डिस्टिलरी एक दिवसीय उत्पादनात ही उच्चांक…

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे डिस्टिलरीमध्ये 45 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेवर दि. 27 नोव्हेंबर रोजी 64 हजार 598 लिटर रेक्टरीफाईड स्पिरिटची निर्मिती केली आहे. डिस्टिलरी स्थापने (1984-85) पासूनचा एकदिवसीय उत्पादनातील हा सर्वांत मोठा उच्चांक आहे.

याबद्दल ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, तज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले पाटील, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व संचालक मंडळाने वर्क्स मॅनेजर एस. डी. चौधरी, तांत्रिक सल्लागार एम. एस. मुरकुटे, चीफ इंजिनिअर राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, डिस्टिलरी इंचार्ज महेंद्र पवार, सर्व सिनी.डिस्टिलरी केमिस्ट,ऑपरेटर्स, इंजिनिअर्स, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट्स व सर्व कामगारांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या