Friday, April 26, 2024
Homeजळगावरावेर पीपल्स बँकेत लोकमान्य पॅनलचा १३ पैकी सात जागांवर विजय

रावेर पीपल्स बँकेत लोकमान्य पॅनलचा १३ पैकी सात जागांवर विजय

रावेर|प्रतिनिधी raver

दि.रावेर पिपल्स बँकेच्या निवडणुकीत सहकार विरुद्ध लोकमान्य पॅनल अशी लढत होवून,यात लोकमान्य पॅनलला ७ जागा तर सहकार पॅनलला ६ जागा मिळाल्या आहे.अटीतटीच्या लढतीत लोकमान्य पॅनलला बहुमत मिळाले आहे.तर सहकार पॅनलचे प्रमुख ज्ञानेश्वर महाजन यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

- Advertisement -

   येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या अध्यक्षेतेखाली स.७ वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली होती.दि.१० जून रोजी १३ जागांसाठी ४२०६ मतदारांचे मतदान झाले होते.या निवडणुकीच्या निकालात लोकमान्य पॅनलचे विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते) सर्वसाधारण मतदार संघात प्रल्हाद रामदास महाजन (२१८८),सोपान साहेबराव पाटील (१८३७),मानस अरुण कुलकर्णी (१७९५),संजय गंगाधर वाणी (१७९४),राजेश सुधाकर शिंदे (१७१६),तर अटीतटीच्या ओबीसी मतदार संघात दिलीप हिरामण पाटील (२१३५) यांचा विजय झाला आहे,त्यांनी सहकार पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर महाजन(१७९२) यांचा पराभव केला.भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात अँड प्रवीण पासपोहे (२१७१) यांचा विजय झाला आहे,त्यांनी महेंद्र पवार (१७१८) यांचा पराभव केला. सहकार पॅनलचे विजयी उमेदवार सर्वसाधारण मतदार संघात सोपान बाबुराव पाटील (१९६५),राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (१७७१),पंकज राजीव पाटील (१७२५),महिल्रा राखीव मतदार संघात मीराबाई चंपालाल राउत (१८३५), पुष्पाबाई गणेश महाजन (१८९७),विजयी झाल्या आहे. तर शैलजा अशोक महाजन (१७२०),योगिनी राजेश पाटील यांना (१७२९) मते मिळून त्यांचा पराभव झाल आहे.अनुसूचित जाती जमाती मतदार संघात विनोद नारायण तायडे (१९१५) विजयी झाले तर तर त्यांचे प्रतिस्पर्धी विकास वामन अवसरमल यांना (१९११) मते मिळून त्यांचा पराभव झाला आहे.सहकार पॅनलला ६ व लोकमान्य पॅनलचा ७ जागा मिळाल्या आहे.   

मोठ्या प्रमाणात बाद झाले मतदान       

सर्वसाधार मतदार संघात (३२२),महिला राखीव मतदार संघात (२१४),ओबीसी मतदार संघात (२७९),भटक्या जाती जमाती मतदार संघात (३१६),अनुसूचित जाती जमाती मतदार संघात (३८०) मतदान बाद झाले आहे.

 सात नवख्यांना पिपल्स बँकेत संचालक पदाची संधी 

दि.रावेर पीपल्स बँकेत  मानस कुलकर्णी,राजेश सुधाकर शिंदे,दिलीप हिरामण पाटील,राजेंद्र पंढरीनाथ चौधरी,मीराबाई चंपालाल राउत,पुष्पाबाई गणेश महाजन,विनोद नारायण तायडे हे  ७ संचालक पीपल्स बँकेत पहिल्यांदा निवडून आले आहे.  

- Advertisment -

ताज्या बातम्या