Saturday, May 11, 2024
Homeनगरलोहगाव येथे भरदिवसा घरफोडी

लोहगाव येथे भरदिवसा घरफोडी

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील रंगनाथ दगडू ढेरे यांच्या घराचा दरवाजा तोडून दि. 12 जानेवारीला दिवसा ढवळ्या 18 तोळे सोने व 50 हजार रुपयाची जबरी चोरीची घटना घडली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

लोहगाव ता. नेवासा येथील रंगनाथ दगडू ढेरे यांनी म्हटले की, 12 जानेवारी रोजी सकाळी शेतीच्या कामासाठी घर बंद करून पत्नीसह गेले होते. कामावरून पुन्हा साडेसहा वाजता घरी आल्यानंतर दरवाजा उघडा दिसला घराचा दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातून व शोकेस मधून पाच तोळे वजनाचा सोन्याचा महाराणी हार, चार तोळे वजनाचे गंठण, दीड तोळ्याचे नेकलेस, दीड तोळ्याची सोन्याची चैन, अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, तीन तोळ्याचा लक्ष्मीहार, पाच ग्रॅम वजनाची पिळ्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे बदाम अंगठी, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, पाच ग्रॅम वजनाची बदाम अंगठी, चांदीचे पंचपाळे व रोख रक्कम 50 हजार एवढा ऐवज चोरून नेला.

दरम्यान सोनई गावातून 14 जानेवारीला रात्री महावीर पेठेतील लक्ष्मीकांत दायमा यांची एमएच 17 बी डब्ल्यू 3421 क्रमांकाच्या दुचाकीचीही चोरी झाली असून आसपासच्या वाडीवस्तीवरही चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतीचे पंप, इलेक्ट्रिक मोटारींचीही काही ठिकाणी चोरी केली आहे.

यापूर्वी या परिसरात शेतीच्या साहित्यासह दुचाकी चोरीचेही प्रमाण वाढले आहे. सोनई पोलीस ठाण्याने या चोरींचा तपास लवकर लावण्याची गरज असून परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे. घरफोडीप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या