Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यालॉजिस्टिक पार्क मनपा हद्दीबाहेर?

लॉजिस्टिक पार्क मनपा हद्दीबाहेर?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेने आडगाव परिसरात 100 एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारण्याची योजना आखली होती. या लॉजिस्टिक पार्कच्या पहाणीसाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी मंडळाने नुकतीच नाशिकला भेट दिली. मात्र शहराच्या हद्दीच्या बाहेरच्या जागांची पहाणी करुन ते पथक महानगराच्या जागेबद्दल अवाक्षरही न काढता परतल्याने लॉजिस्टिक पार्कचा निर्धारित प्रकल्प पुन्हा गोत्यात येणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या तत्कालीन सर्वसाधारण सभेने लॉजिस्टिक पार्क नाशिकच्या हद्दीत उभारण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यावेळी नाशिक दौर्‍यावर असताना केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक प्रशासनाला शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक पार्क उभारण्याची सूचना केली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या मंत्रालयाकडून मदतीचे आश्वासनही दिले होते.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पहाणी पथकाने नाशिकच्या जागांची पहाणी करण्यासाठी विशेष दौरा आखला होता.मात्र या भेटीत त्यांनी मनपाच्या हद्दीत पहाणी करणेतर सोडाच मनपा अधिकार्‍यांशी संपर्कही साधलेला नव्हता.हे पहाणी पथक परस्पर शहराच्या हद्दीबाहेरील जागांची पहाणी करुन स्वगृही परत गेल्याचे वृत्त आहे.त्यामुळे नाशिकला लॉजिस्टिक पार्क उभे राहण्याचे स्वप्न धुसर होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात नाशिकला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव येथे ट्रक टर्मिनसची जागा आधीच उपलब्ध आहे. केंद्राच्या निधीतून प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी ही जमीन देण्यास मनपाचा होकार आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि सुरत-चेन्नई गी्रनफिल्ड कॉरिडॉरच्या छेदनबिंदूवर तो उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र या प्रस्तावाला थंड बस्त्यात ठेवल्याचे दिसून येत आहे.

विस्तारासाठी मनपाची 15 एकर जागा

महापालिकेच्या माध्यमातून आडगावमध्ये 60 एकर जागेवर ट्रकसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित होते. त्यात विस्तारासाठी महापालिकेच्या 15 एकर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. उर्वरित जागेसाठी नागरी नापिक व खडकाळ जागांचा शोध घेण्याचा प्रस्ताव होता. या बाबतचा सविस्तर अहवाल केंद्राकडे पाठवून मनपाने जागेबद्दल होकार कळवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या