Friday, April 26, 2024
Homeनगरशौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून लॉज मालकासह तिघांना बेदम मारहाण

शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून लॉज मालकासह तिघांना बेदम मारहाण

वैजापूर | वार्ताहर

शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून जमावाने लॉज मालकासह तिघांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैजापूर इथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरालगत असलेल्या लाडगाव चौफुली जवळील द्रौपदी लॉज येथे आकाश संजय मापारी (वय 24 वर्षे) हे आपला लॉजिंगचा व्यवसाय करता. शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास काही इसमांनी त्यांना बाथरूम वरून जाण्याच्या कारणावरून लोखंडी गजाने, बुक्क्यांनी मारहाण केली.

सासरच्यांनी छळले, विवाहितेने जीवन संपविले

घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व अन्य पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले. पोलीस आले हे बघत आरोपी तिथून पसार झाले तर यावेळी पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या आकाश मापारी त्यांचे वडील संजय मापारी यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. घटनेचा तपास करत असताना पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये जखमींना मारहाण झाल्याचे दिसले स्पष्ट झाले.

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे व पोलीस अमलदार प्रशांत गीते यांनी जखमींचा रुग्णालयात जाऊन जबाब नोंदवला. ज्यावरून तौसीफ हनिफोदिन शेख (राहणार मिर्झा गल्ली), सय्यद अझर कादरी (राहणार खानगल्ली) जमीन सगीर शेख व सलीम राहणार (वैजापूर) यांच्यासह इतर दहा ते पंधरा लोकांनी लॉज मध्ये बाथरूम साठी जाण्याचा कारणावरून मारहाण केल्याचे मापारी यांनी त्यांच्या जबाब नोंदवले.

‘त्या’ ट्विटमुळं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; बार्शीत गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक संजय लोकर यांनी आरोपी तौसीफ हनीफुद्दीन शेख, सय्यद अझर कादरी, जमीर समीर शेख व सलीम या चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अन्य आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

प्रवाशी बसचा भीषण अपघात, १९ ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

सदरची कारवाई ही सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, सपोनी विजय नरवाडे, राम घाडगे, psi रज्जाक शेख, कल्याण पवार, asi घागरे, पोलीस अंमलदार मोईस बेग, योगेश झालटे, कुलदीप नरवडे, प्रशांत गिते, विजय भोटकर, प्रल्हाद जटाले, प्रकाश लघाने, अजित नचन व होमगार्ड यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या