Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे : 516 उद्योग सुरु करण्यास परवानगी

पुणे : 516 उद्योग सुरु करण्यास परवानगी

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातही मुंबई-पुण्यातील करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, करोना प्रादुर्भाव असलेल्या रेडझोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक चाके फिरु लागली आहेत. अटीशर्तींसह 516 उद्योगांना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामAध्ये अत्यावश्यक सेवेतील 460 आणि अन्य क्षेत्रातील 56 उद्योगांचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात जिथे करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. पुणे आणि पिंपरी महानगरपालिकांची हद्द वगळता जिल्ह्यातील इतर भागांमध्ये 516 उद्योगांना परवानगी देण्यात आली. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील 460 आणि अन्य क्षेत्रातील 56 उद्योगांचा समावेश आहे. कुरकुंभ, जेजुरी, इंदापूर आणि पाटस याभागातील एमआयडीसीत हे उद्योग सुरु करण्यात आले आहेत.

दूध, दुग्धजन्य अन्नपदार्थ, औषध आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मितीही सुरु झाली आहे. तसेच, जीवनावश्यक 460 उद्योगधंदे सुरु झाले आहेत. 56 उद्योगांपैकी 19 उद्योगांनी उत्पादनही सुरू केले आहे. त्याच बरोबर पुणे विभागातील इतर चार जिल्ह्यातही परवानगी उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. नियम आणि अटीशर्तीनुसार, उद्योगधंदे सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या