Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशलॉकडाऊनमध्ये एक कोटी मजूरांचा पायी प्रवास

लॉकडाऊनमध्ये एक कोटी मजूरांचा पायी प्रवास

नवी दिल्ली –

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 24 मार्चला देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. मार्च ते जून महिन्यामध्ये

- Advertisement -

एक कोटी सहा लाख स्थलांतरित मजूर पायी प्रवास करत आपल्या मूळ राज्यात पोहचल्याचं माहिती केंद्र सरकारने दिली आहे. रस्ते परिवहन राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी लोकसभेमध्ये ही माहिती दिली.

अवघ्या काही तासांची मुदत देत लॉकडाउनची घोषणा केल्याने स्थलांतरित मजुरांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेकजण रोजगार गमावल्याने चालतच स्वत:च्या मूळ राज्यात निघालेे. किती मजुरांनी स्थलांतर केलं यासंदर्भातील माहिती आपल्याकडे नसल्याचे केंद्राने आधी सांगितलं होतं. मात्र आता याबाबत आकडेवारी जाहीर केली असली तरी या कालावधीमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला याबद्दलची माहिती सरकारने दिलेली नाही.

हायवेवरुन चालत जाणार्‍या मजुरांची वाहतूक करण्यासाठी सरकारने सोय केल्याची माहितीही रस्ते परिवहन राज्यमंत्री सिंह यांनी दिली. या मजुरांच्या खाण्यापिण्याची, औषधांची आणि चप्पलांची व्यवस्थाही सरकारने केल्याचे सांगण्यात आलं. या मजुरांना आश्रय देण्यासाठी जागेची व्यवस्थाही केंद्र सरकारने केली आणि अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने या मजुरांना घरी पोहचवण्याची व्यवस्था केल्याचेही सिंह आपल्या उत्तरात म्हणाले आहेत. गृह मंत्रालयाने 29 एप्रिल 2020 आणि 1 मे 2020 रोजी दिलेल्या आदेशानंतर या मजुरांच्या प्रवासासाठी विशेष बस आणि श्रमिक ट्रेन्सची व्यवस्था करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या