Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरस्थानकवासी जैन संघ श्रीरामपूर न्यासाची निवडणूक होणार

स्थानकवासी जैन संघ श्रीरामपूर न्यासाची निवडणूक होणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

स्थानकवासी जैन संघ श्रीरामपूर या न्यासाची निवडणूक 1997 नंतर झाली नसल्यामुळे निवडणूक घ्यावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली.

- Advertisement -

त्यावेळी सुनावणी होऊन निवडणूक घेण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले असता संघाचे अध्यक्ष रमेश लोढा यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात त्याविरुध्द याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयाने रमेश लोढा यांची याचिका फेटाळून लावत 1997 च्या सभासद यादीस वैध मानून त्याआधारे स्थानकवासी जैन संघ श्रीरामपूर या न्यासाची निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी व एस. व्ही. गंगापूरवाला यांनी दिले.

1997 नंतर स्थानकवासी जैन संघ श्रीरामपूर न्यासाची निवडणूक झाली नसल्यामुळे न्यासाचे सभासद दीपक हुकुमचंद दुग्गड व रमेश रतनचंद गुंदेचा यांनी धर्मदाय सहा. आयुक्त, अहमदनगर यांचेकडे न्यासाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणारा अर्ज सादर केला.

त्यावर धर्मदाय सहा. आयुक्त यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत 20 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यासाचे अध्यक्ष रमेश इंद्रभान लोढा यांनी धर्मदाय सहा. आयुक्त यांच्या निकालाविरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत मुख्यत: 1997 ची यादी वैध ठरवून त्या यादी आधारे निवडणूक घेण्यास आक्षेप घेतला.

मात्र उच्च न्यायालयाने संघाचे अध्यक्ष रमेश लोढा यांची याचिका फेटाळून लावत महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायदा कलम 41 अ नुसार न्यासाच्या सुव्यवस्थित तसेच उपविधाी नुसार कार्यरत राहण्यासाठी योग्य ते आदेश करण्यचे धर्मदाय सहा. आयुक्त यांना आधिकार आहेत.

सबब सहा. धर्मदाय आयुक्त यांनी सन 1997 च्या निर्विवादात सभासद यादीनुसार निवडणुक घेण्याबाबतचे आदेश हे न्यायसंगत असुन न्यासाच्या सुव्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी आश्यक असल्याचे मत नोंदवुन रमेश लोढा यांची स्थानकवासी जैन संघा न्यासामार्फत दाखल केलेली याचिका फेटाळुन लावली व धर्मदाय सहा. आयुक्त यांनी दिलेला आदेश कायम ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधिश श्रीकांत कुलकर्णी व एस. व्ही. गंंगापुरवाला यांनी दिले.

याप्रकरणी याचिकाकर्ते रमेश लोढा यांच्यावतीने अ‍ॅड. दिक्षित यांनी काम पाहिले तर प्रतिवादी दिपक दुग्गड व रमेश गुंदेचा यांचेवतीने अ‍ॅड. बी. डी. लोने यांचे मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. व्ही. एस. माने यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकील अ‍ॅड. ए. ए. जगतकर यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली.

उच्च न्यायालनयाने दिलेल्या निकालाचे न्यासाचे रमेश कोठारी, सतिष चोरडीया, प्रविण टाटीया, मनसुख चोरडीया, हेमंत खाबिया, अभय मुथा, सुरेशचंद्र बाठिया, रमेश गुंदेचा, दिपक दुग्गड आदिसह जैन समाजाने स्वागत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या