Thursday, April 25, 2024
Homeनगरस्थानिक हार्वेस्टरचालकांकडून राहुरी तालुक्यात शेतकर्‍यांची आर्थिक लूट

स्थानिक हार्वेस्टरचालकांकडून राहुरी तालुक्यात शेतकर्‍यांची आर्थिक लूट

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गहू सोंगणीचा हंगाम जवळ येत असतानाच राहुरी तालुक्यात हार्वेस्टरचालकांची धावपळ सगळीकडे दिसून येत आहे.

- Advertisement -

मात्र, बाहेरून येणार्‍या हार्वेस्टर चालकांना स्थानिक हार्वेस्टरचे मालक दडपशाही करून पिटाळून लावताना येथील शेतकर्‍यांकडून गहू मळणीचे मनमानी पैसे घेत आहेत. बाहेरील हार्वेस्टर चालकांना पळवून लावणार्‍या स्थानिक हार्वेस्टरचालकांच्या मनमानीला प्रशासनाने चाप लावावा, शेतकर्‍यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी राहुरीचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांनी केली आहे.

याबाबत बाहेरील हार्वेस्टर चालकांना संरक्षण देण्यासाठी आपण स्वतः तत्पर राहू, अशी ग्वाहीही त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. स्थानिक हार्वेस्टरचालक शेतकर्‍यांकडून मनमानी दामाची मागणी करीत आहेत. तर बाहेरील हार्वेस्टरचालकांना दमबाजी करून पिटाळून लावत आहेत. याबाबत कोणत्याही हार्वेस्टरचालकाला दमबाजी व इतर मार्गाने दडपशाही करण्याचा प्रयत्न झाल्यास आपल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ताराचंद तनपुरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या