Wednesday, April 24, 2024
Homeजळगावस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर

भुसाावळ (प्रतिनिधी) bhusawal

मोदी सरकारने जर शेतकर्‍यांवर होत असलेले अत्याचार थांबविले नाही तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे १ जानेवारीपासून आत्मनिर्भर अत्याचार प्रतिकार अभियान राज्यभरात राबवले जाईल तसेच आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जि.प.च्या निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याची घोषणा पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. तसेच या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष सोबत आल्यास त्याबाबत आम्ही विचार करू असे ही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दि.२० रोजी दुपारी पीआरपीच्या कार्यकार्ता मेळाव्यानिमित्ताने शहरात आले असतांना येथील शासकीय विश्रमागृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, उत्तर महाराष्ट्र युवा उध्यक्ष राकेश बग्गन, आरिफ शेख, अकिल शहा, चंदु पहेलवान, संतोष मेश्राम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले की, कॉंग्रेस पक्षासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची १९९७ पासून युती आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. सत्तेमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षाने मित्र पक्षांना सोबत घेऊन त्यांना त्यांचा वाटा दिला आहे. शिवसेनेने ही बच्चू कडू यांना पद दिले तसे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अद्यापही पीआरपीच्या नेत्यांना कोणतेही मंत्रीपद देण्यात आले नाही. याचा आम्हाला राग नाही, मात्र खंत आहे. सत्येमध्ये जो वाटा मिळाला पाहिजे तो अद्यापही आम्हाला मिळाला नाही अशी खंत प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली.

भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर यांनी, कॉंग्रेसने लाचारी सोडून सत्तेला लाथ मारून सत्तेबाहेर पडावे असे वक्तव्य सांगली येथे केले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, सोनिया गांधी यांनी ठाकरे सरकारला अल्पसंख्यांक समाजा विषयी पत्र लिहून मानवता जोपासली आहे. कुठे हिमालय आणि कुठे मुतखडा असा अशा खालच्या पातळीवर टीका करीत प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आ. पडळकरांना टोला लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या