Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशआजपासून बँकेत जमा होणार ही रक्कम

आजपासून बँकेत जमा होणार ही रक्कम

नवी दिल्ली :

एमएसएमई कर्जे, शिक्षणकर्जे, गृहकर्जे, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतलेली कर्जे, क्रेडिट कार्डाची थकित रक्कम, वाहनकर्जेंची रक्कम बँकेत जमा होणार आहे.भारतीय स्टेट बँकेची या संपूर्ण योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने घोषीत केलेल्या हप्तेस्थगितीच्या व्याजावरील व्याजमाफीची रक्कम खात्यात आजपासून जमा होणार आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील तफावत असलेली रक्कम कर्जदारांच्या खात्यात जमा होणार आहे.

व्याजमाफीची रक्कम कर्जदारांच्या खात्यात जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे आजच बँकांना कर्जदारांना कॅशबॅक द्यावी लागणार आहे. दरम्यान कर्जदारांना मागील दोन दिवसांपासून बँकांकडून अशा प्रकारचे मेसेज येत आहेत. ज्यात Covid-19 Relief ex-gratia उल्लेख करून काही रक्कम खात्यात जमा केली जात आहे.

व्याजमाफी योजनेचा लाभ एमएसएमई कर्जे, शिक्षणकर्जे, गृहकर्जे, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतलेली कर्जे, क्रेडिट कार्डाची थकित रक्कम, वाहनकर्जे, व्यावसायिकांनी घेतलेली वैयक्तिक कर्जे व वापरासाठी घेतलेली कर्जे यांना मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या