प्रवाशाकडे आढळली जिवंत काडतुसं; मुंबई विमानतळावरील घटना

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) बॅगेज स्क्रीनिंग दरम्यान प्रवाशाच्या बॅगेत जिवंत काडतुसे आढळल्याची घटना घडली आहे…

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जिवंत काडतुसं आढळल्याने विमानतळावर पोलीस (Police) सतर्क झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक ’देशदूत’ची लोकप्रिय पुरवणी ’शब्दगंध’ आता दर शनिवारी

दोहाहून मुंबईला (Mumbai) आलेल्या विमानातून एका प्रवाशाला केरळमधील कोझिकोडे विमानतळावर जायचे होते. त्याचे सामान पाठवण्यात आले. त्यावेळी सामानाच्या तपासणीदरम्यान बॅगेत संशयास्पद वस्तू आढळल्याचे निदर्शनास आले.

सप्तशृंगी देवी दर्शनाबाबत विश्वस्त संस्थेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलिसांना तपासणीत त्याच्या बॅगमधून जिवंत काडतुसं आढळून आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फैसल पारंबील नावाच्या प्रवाशाविरुद्ध कलम २५ आणि आर्म्स अॅक्टच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *