नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; लिथियम बॅटरी निर्मिती स्टार्टअपला उद्योग रत्न पुरस्कार

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (kkw engineering college) माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ई-मोर्टल ऑटोमोटिव्हीस् स्टार्टअपला ‘महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट लिथियम बॅटरी’ निर्मिती स्टार्टअप(lithium battery production start up) म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिव्हल संस्थेमार्फत महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार प्रदान केला जातो….

के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील (K K wagh engineering college) विद्युत अभियांत्रिकी शाखेत २०१९ साली शिक्षण पूर्ण केल्यानंतर मयूर शेलार, धवल तगारे आणि ओंकार सोनवणे यांनी इमॉरटल ऑटोमोटिव्हजची स्थापना केली.

महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात असताना त्यांनी आपल्या सहकऱ्यांबरोबर विद्युत वाहनाची निर्मिती केली व या क्षेत्रातच पुढे व्यवसाय करण्याचे ठरवले होते.

आपल्या स्टार्टअची सुरुवात त्यांनी बॅटरी निर्मिती (Battery Production) साठी २०० स्क्वे. फूटाच्या छोट्या जागेत केली. ज्याचे रूपांतर आता ३००० स्क्वेअर फूट इतक्या जागेत झाले. त्यांनी सुरुवात सोलर पथदीपसाठी लागणाऱ्या बॅटरीज् पासून सुरु केली.

त्यानंतर त्यात अधिकचे संशोधन केल्यानंतर युनिक अरेंजमेंट (Unique Arrangement) पद्धतीचा वापर करून बॅटरीची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढवण्यावर भर दिला. परिणामी आता सोलर सोबतच इलेक्ट्रिक व्हेईकल, (Electric Vehicle) लिफ्ट, (Lift) ट्रॅफीक लाईट, (Traffic Light) कम्युनिकेशन टॉवर (Communication Tower) इत्यादी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या बॅटरीज् चे उत्पादन इमॉरटल ऑटोमोटिव्हज् द्वारे केले जाते.

नाशिक सोबत महाराष्ट्राबाहेर सुद्धा आज अनेक ठिकाणी या बॅटरीला मागणी आहे. बॅटरी निर्मितीसोबतच आता ई -मोर्टल ऑटोमोटिव्हज् ची टीम स्वतःच्या इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीसाठी काम करत आहे. यासाठी केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) मान्यता दिली आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना विविध शिक्षक तज्ज्ञांकडून झालेल्या मार्गदर्शामुळेच हे यश संपादन करता आले असे मत धवत तारगे यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ के. एन. नांदुरकर आणि विभाग प्रमुख डॉ बी ई. कुशारे यांच्या प्रेरणेमुळेच उद्योजक बनण्याचे बीज मनात पेरले गेले व ते प्रत्यक्ष आले अशा भावना मयूर शेलार आणि ओंकार सोनावणे यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या या यशाबद्दल व पुढील वाटचालीबद्दल संस्थेचे विश्वस्त समीर वाघ, प्राचार्य के.एन. नांदुरकर आणि प्रभारी विभाग प्रमुख डॉ रवींद्र मुंजे यांनी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *