Friday, April 26, 2024
Homeजळगावआडमुठे धोरणाने बळीराजाची दिवाळी अंधारातच !

आडमुठे धोरणाने बळीराजाची दिवाळी अंधारातच !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हा प्रशासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे वितरण होवून मंगळवार दि. 17 नोव्हेबर उजाडून देखिल जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीच्या मदतीस पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्याच संबधीत बँक प्रशासनांना प्राप्त झालेल्या नाहीत.

- Advertisement -

त्यामुळे अजूनही राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या मदतीचा कण देखिल शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग झालेला नसल्याने हजारोंचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची दिवाळी मात्र खर्‍या अर्थान अंधारातच गेली असल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्री ना. पाटील यांनी प्राधान्याने लक्ष देउन शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते.

त्यानुसार शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत जिल्हा प्रशासनाला सुमारे 19 कोटी 55 लाख रूपयांचा निधी बुधवार दि. 11 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला झाल्यानंतर तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्यांनुसार संबधीत तहसिल प्रशासनाला निधीचे वितरण करण्यात आले होते.

असे असूनही जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य बँकामधे तालुकास्तरावरून मदतीस पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्याच प्राप्त झालेल्या नसल्याने बळीराजाची दिवाळी अंधारातच गेली असल्याचे बोलले जात आहे.

मदत निधी लाभाची रकम काढण्यासाठी शेतकरी गेले असता शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर इतर वारस दारांची नावे असणे, जोडखाते अशा विविध कारणांसाठी प्रशासनाकडून अडवणूक करण्यात येवून बर्‍याच वेळा तलाठयांचा दाखला विकासोच्या सेक्रेटरींचे पत्र अथवा संबधीत बँक प्रशासनाकडून मागीतले जाते.

बर्‍याच शेतकर्‍यांना या पत्रापत्रीच्या कारभारामुळे मदतीचा लाभच मिळत नसल्याने ते वंचित रहात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या.

इतकेच नव्हेतर बर्‍याच शेतकर्‍यांचे बँक खाते आधार लिंक नसणे वा आधार क्रमांक चुकीचा असणे, केवायसी केलेले नसणे अशा अनेक प्रशासनिक कारणामुळे शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत वर्ग होउनही या रकमेचा लाभ शेतकर्‍यांना मिळालेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या