Friday, April 26, 2024
Homeनगरबेलापूर येथे देशी दारूचे दुकान फोडले

बेलापूर येथे देशी दारूचे दुकान फोडले

बेलापूर (प्रतिनिधी) – बेलापूर-नगर रस्त्यावर असणाऱ्या दारुच्या दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी ८५ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे.

दुकानाचे मालक के. जी. गोरे यांचे देशी दारुचे दुकान आहे. सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान उघडण्यास गेले असता दुकानाचे कुलुप उघडे असल्याचे दिसले त्यांनी तातडीने बेलापूर पोलीसांना घटनेची खबर दिली. बेलापूर पोलीसांनी तातडीने नगर येथील डाँग स्काँडला पाचारण केले. काही अंतर गेल्यानंतर स्वान परीसरातच घुटमळला. या वरुन चोरटे वहानातुन आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या