Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमोकळ्या जागी उभा होता विदेशी मद्याने भरलेला ट्रक; चोरट्यांचा कार्यक्रम पाहून थक्क...

मोकळ्या जागी उभा होता विदेशी मद्याने भरलेला ट्रक; चोरट्यांचा कार्यक्रम पाहून थक्क व्हाल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मोकळ्या जागेत उभा असलेल्या ट्रकची ताडपत्री उचकुन अज्ञात चोरट्याने मद्याचे बॉक्स चोरून नेल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… (Indiranagar Police Station)

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ रामकिसन सातपुते (28, रा. फ्लॅट नंबर 5, स्वराज्य नगर अंजना लॉन्स मागे पाथर्डी फाटा ) यांनी दिनांक 11 डिसेंबर रात्री आठ ते 12 डिसेंबर सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान दारूच्या बॉक्सने भरलेला ट्रक ( एम एच 15 जी व्ही 7767 ) मोकळी जागेत पार केला होता.

या ट्रकमध्ये विदेशी मद्याच्या बॉटलचे बॉक्स होते. अज्ञात चोरट्याने ट्रकची ताडपत्री उचकुन दारूचे 23 बॉक्स असा एक लाख 76 हजार 640 रुपयांचा माल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास हवालदार आर. के. शेख करीत आहेत. (liquor robbery from truck at new nashik)

- Advertisment -

ताज्या बातम्या