Saturday, April 27, 2024
Homeजळगावजिल्ह्यात पोहचणार 39 टन लिक्विड ऑक्सिजन

जिल्ह्यात पोहचणार 39 टन लिक्विड ऑक्सिजन

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एकदिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली.

- Advertisement -

त्यानुसार रविवार, 11 एप्रिल रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यासाठी 39 टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार आहे. यानिमित्ताने खडसेंच्या प्रयत्नांनी जिल्ह्याला ऑक्सिजनच्या पुरवठ्याची होणारी कमतरता दूर होणार आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आगामी काळात मागणी वाढत राहिल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता पुरवठादाराने व्यक्त केली होती. याची गंभीर दखल घेत माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.

त्यानुसार जिल्ह्यात एकच दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे लक्षात आल्यानंतर खडसे यांनी तात्काळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली.

त्यानुसार उद्या 11 एप्रिल रोजी सकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी 39 टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार आहे. दुसरीकडे खडसे यांनी चर्चा रेमडेसिव्हर इंजेक्शनबाबत चर्चा केल्यानंतर चार हजार इंजेक्शन जिल्ह्यात पाठविण्यात आले होते.

तर आता देखील येत्या दोन दिवसात आवश्यक असतील तेवढे रेमडेसिव्हर इंजेक्शन पाठविण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एकनाथराव खडसे यांना दिले आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या