Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : दवाखान्यात राडा घालत तुंबळ हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद

Video : दवाखान्यात राडा घालत तुंबळ हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रुग्णावर दवाखान्यातील स्टाफ उशिराने उपचार का करत आहात? त्याला काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही असा दम देत दिंडोरी रोडवरील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital dindori road nashik) काल दुपारी साडेतीनच्या सुमारास रुग्णाच्या मित्रांनी अभूतपूर्व राडा घातला….

- Advertisement -

यावेळी येथील डॉक्टरांच्या मुलास या तिघा संशयितांनी मारहाण केली. (three Suspects) याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाणीनंतर तिघेही संशयित फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

अधिक माहिती अशी की, दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या (Reliance petrol pump) पाठीमागे डॉ अरुण विभांडिक (Dr Arun Vibhandik) यांचे लीलावती हॉस्पिटल आहे. याठिकाणी काल (दि १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास विजय धात्रक या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. रुग्णावर प्राथमिक उपचार केले जात होते. याच वेळी धात्रक याचे मित्र ओंकार जाधव व भैया शिराळ हे याठिकाणी आले.

त्यांनी रुग्णावर उपचार करण्यास विलंब का होत आहे? या कारणावरून वाईटसाईट शिवीगाळ सुरु केली. विजयला काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही असा दम देत डॉ विभांडिक यांचा मुलगा सौरभ विभांडिक याच्यासोबत वाद घातला. त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या नाकावर वार केले. यानंतर जखमी सौरभवर उपचार करण्यात आले.

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात महारष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि सेवा संस्था हिसंक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध अधिनियम २०१० ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या