Friday, April 26, 2024
HomeUncategorizedबोधी ट्री फाऊंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार

बोधी ट्री फाऊंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार

औरंगाबाद- Aurangabad

एनजीओ बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनच्या (( Bodhi Tree Foundation)) वर्धानपन दिनानिमित्त राज्यातील ३६ जणांना जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सामाजिक, शिक्षण क्षेत्रासह पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील ५, पत्रकारिता क्षेत्रातील १६ आणि शिक्षण क्षेत्रातील १५ व्यक्तींचा समावेश होता.

- Advertisement -

यावेळी उपसंचालक अनिल साबळे, अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर, शेख शिराज सुजाउद्दीन इनामदार, उपसंचालक धीरज खिरोडकर, बोधी ट्री एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे, आत्माराम बोराडे, डॉ. प्रवीण चाबुकस्वार उपस्थित होते. पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्ह्यातील सहा पत्रकारांना शाल, मानाचा फेटा, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये पत्रकार प्रा. पंजाबराव मोरे, उज्वला साळुंके, विद्या गावंडे, संजय हिंगोलीकर, कल्याण अन्नपूर्णे आणि अरुण सुरडकर यांचा समावेश होता. याशिवाय आत्माराम बोर्डे, प्रल्हाद शिंदे, दिलशाद तांबोळी, शाहीर अजिंक्य लिंगायत, तुकाराम भवर, जयश्री पवार, डॉ. गायत्री पाटील, डॉ. कैलास काकडे, मनीषा शिरटावले, अनुपमा दाभाडे, कुसुम मेरुरकर, रसिका रेवाळे, संजय पाटील, भारती शिवणकर, सोनी कानडे, दर्शना  मुकणे, जाकिरा जावेद मुल्ला, गोविंद देसाई, मनोहर मोहरे, तसेच संदीप बेंद्रे, अनिल गायकवाड, रफिक घाची, अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद, सुनील पोपळे, सिद्धेश्वर विश्वेकर आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप ढाकणे तर रज्जाक शेख यांनी आभार मानले. मीरा वाघमारे, कल्पना फुसे, अण्णा आंधळे, संतोष पांचाळ, शामराव रावले, नागनाथ घाटूळे, विजयकुमार काळे, अंशीराम वाघमारे, अमर सपाटे, ऋत्विक वाघमारे, संदीप अझादे, प्रेरणा वाघमारे, नीलेश उघडे, दीपक वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या